Chinchwad : …म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी सुट्ट्यांचा प्लॅन गुंडाळला

एमपीसी न्यूज – जर गरज असेल तरच रजा घ्या. गरज नसताना रजा घ्यायची (Chinchwad ) असेल तर प्रभारी पदाचा पदभार सोडा, अशी तंबी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. नुकत्याच झालेल्या आयुक्तालयाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ही कानउघडणी केली.

दिवाळीनिमित्त आयुक्तांनी तीन टप्प्यांमध्ये सुटीचे नियोजन केले होते. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यंदा कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेता आला. असे असतानाही काही पोलीस ठाण्यांच्या व काही पथकांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून रजेचे अर्ज सादर करण्यात आले. अशा निरीक्षकांना आयुक्तांनी खडेबोल सुनावले.

Pune : पुण्यात सकाळी धुके तर दिवसभर ढगाळ वातावरण…1 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता

विनाकारण रजा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गरज असेल तरच रजा घ्या. उगीचच रजा घ्यायची असेल तर ‘प्रभारी’ पदाचा पदभार सोडा, अशी तंबी मिळाल्यानंतर काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांचा सुट्टीचा ‘प्लॅन’ गुंडाळाला.

कामकाजात गतिशीलता येण्यासाठी विविध सूचना

खून प्रकरणी उकल न झालेले पाच गुन्हे आहेत. त्यात चाकण विभागात खून प्रकरणाचे तीन गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. यातील दोन गुन्हे युनिट दोनकडे तपासासाठी देण्याबाबत आयुक्तांनी सूचना केली.

तसेच ‘सीसीटीएनएस’ प्रणालीवर माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. मात्र, काही प्रकरणे प्रलंबित आहेत. ‘सीसीटीएनएस’ प्रणालीबाबत पेन्डन्सी नको, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर ‘विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी देखील ही मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी विविध पथक व पोलीस ठाण्यांकडून मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या.

मात्र, सध्या राबविण्यात येत असलेल्या ड्राईव्हमध्ये या कारवायांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यासाठी या ड्राईव्हला मुदतवाढ देण्यात आली. तरीही विविध पथके व पोलीस ठाण्यांकडून कारवाईबाबत उदासीनता आहे. याबाबत पोलीस आयुक्त चौबे यांनी नाराजी व्यक्त करत या कारवाया वाढविण्याची सूचना  (Chinchwad ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.