BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : कला ही संस्कारातूनच घडते – सौरभ गोखले 

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – संस्कार हे विकत घेता येत नाही. ते अंगीकृत असावे लागतात. कला ही संस्कारातूनच घडते. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यातूनच उद्याचे कलाकार घडतील, असे मत सिने अभिनेता सौरभ गोखले यांनी  चिंचवड येथे व्यक्त केले.
संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी संस्कार जत्रा भरविण्यात येते. या जत्रेचा समारोप चिंचवड येथील विश्वेश्वर ज्ञानदिप मंडळात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता सौरभ गोखले, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले,  चिंचवड येथील वरीष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप लोंढे, बाबासाहेब मेमाणे, विश्वेश्वर ज्ञानदिप मंडळाचे अध्यक्ष महेश कलाल, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सुनीता गायकवाड, संस्कार  प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 18 जणांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात सौरभ गोखले (कलारत्न पुरस्कार), सचिन चिखले (समाजरत्न पुरस्कार), विवेक मुगळीकर (समाजरत्न पुरस्कार), संगीता जाधव (समाजरत्न पुरस्कार), भाऊसाहेब मातणे (संस्काररत्न पुरस्कार), सुलभा पवार (समाजरत्न), सोनम जांभुळकर (समाजरत्न), भाग्यश्री काळभोर (संस्काररत्न), अशोक वाळुंज (समाजरत्न), काशीनाथ पावसे (समाजरत्न पुरस्कार), बाबासाहेब वैद्य (संस्काररत्न पुरस्कार), रामदास वाडेकर (उत्कृष्ट पत्रकारिता),  रेखा भोळे (समाजरत्न), संजय विसपुते (कलारत्न), डॉ. विद्याधर कुंभार (धन्वंतरीरत्न पुरस्कार), मकरंद पांडे/ नितीन धिमधिमे (युवारत्न), संतोष भिंगारे (समाजरत्न) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना जोशी यांनी केले. प्रकाश शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुधाकर खुडे यांनी मानले.
HB_POST_END_FTR-A2

.