Chinchwad : तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव परिसरातील 155 मंडळांचे आज विसर्जन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सातव्या दिवशी गणेश विसर्जनाची परंपरा (Chinchwad) आहे. घरगुती आणि गणेशोत्सव मंडळांकडून सातव्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 155 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आज (सोमवार, दि. 25) विसर्जन केले जाणार आहे.

तळेगाव दाभाडे शहरात तळ्यावर दोन ठिकाणी विसर्जन घाट आहेत. त्याशिवाय इंदुरी आणि सोमाटणे येथे देखील विसर्जन घाट आहेत. या चार ठिकाणी प्रामुख्याने गणेश विसर्जन केले जाते. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 91 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यांचे सोमवारी विसर्जन होणार आहे. त्याशिवाय घरगुती गणपती विसर्जन देखील होते.

गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्ग बनवण्यात आले आहेत. त्यावर पोलिसांची निगराणी असणार आहे. गणेश विसर्जनासाठी अधिकचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असल्याचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले.

PMRDA : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्य शासनाने स्वीकारला

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 73 गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यातील 32 मंडळे सातव्या (Chinchwad) दिवशी, पाच मंडळे नवव्या दिवशी तर उर्वरित सर्व मंडळे दहाव्या दिवशी विसर्जन करतात. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणे, आडे, आढले बुद्रुक, कुसगाव, गहुंजे या ठिकाणी मोठे घाट आहेत. शिरगाव पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी 40 अंमलदार या संपूर्ण विसर्जनाची सुरक्षा व्यवस्था पाहणार आहेत.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ म्हणाल्या, गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. शासनाच्या सूचनांचे पालन करून विसर्जन करावे. आपला गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसा होईल, यावर सर्वांनी भर द्यावा. अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा.”

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 32 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आज (सोमवारी) विसर्जन होणार आहे. इंदुरी येथील प्रमुख घाटावर बहुतांश गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन केले जाते. त्याशिवाय इंद्रायणी नदीवर ठिकठिकाणी लहान विसर्जन घाट असून तिथेही गाव पातळीवर विसर्जन केले जाते. चार अधिकारी आणि 37 अंमलदार यांचा गणेश विसर्जनासाठी बंदोबस्त आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सावंत म्हणाले, “नदीमध्ये विसर्जन करताना खोल पाण्यात कोणीही उतरू नये. तसेच कोणतीही जोखीम पत्करून पाण्यात अथवा चिखलात जाऊ नये. सर्वांची सुरक्षा बाळगून आनंदात (Chinchwad) गणपती बाप्पाला निरोप द्यावा.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.