Chinchwad : क्रांतिकारकांचे बलिदान उजागर करण्यासाठी शहरात विविध उपक्रम

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Chinchwad) क्रांतिकारकांच्या बलिदानाचे उजागर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान “आझादी का अमृत महोत्सव समापण अभियान कार्यक्रम” संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात राबविला जाणार आहे. या नियोजनाबाबत चिंचवड किवळे मंडलाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये, “हर घर तिरंगा”, “विभाजन विभिषिका दिन” आणि “मेरी माती मेरा देश” या कार्यक्रमासाठी प्रभाग निहाय संयोजक यांची नेमणूक करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.

यामध्ये, प्रभाग सदस्य बिभीषण चौधरी यांची (“हर घर तिरंगा”), माजी नगरसेवक राजेंद्र गावडे (मेरी माती मेरा देश), माजी उपमहापौर सचिन चिंचवडे (विभाजन विभिषीका दिन) यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपा चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, भायुमो प्रदेश सचिव अजित कुलते, चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, चिंचवड किवळे महिला मोर्चा मंडलाध्यक्ष पल्लवी वाल्हेकर, सुरेश भोईर आदी पदाधिकारी – कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा” हे अभियान शहरातील सर्व प्रभागांमध्ये आणि सर्व बूथ वर घरोघरी राबविले जाणार आहे. सामान्य नागरिकांना सुद्धा या अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. 12 ऑगस्ट रोजी शिवाजी चौक वाल्हेकरवाडी ते चिंतामणी गणपती मंदिर असा क्रांतिकारकांचा जिवंत देखावा मिरवणूक काढण्यात येणार आहे.

13 ऑगस्ट रोजी डांगे चौक – वाकड- पिंपळे निलख (Chinchwad) अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश” हा कार्यक्रम मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्याचे केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक प्रभागात असणारे स्वतंत्र सेनानी सेंट्रल व राज्य पोलिस फोर्स, जे दिवंगत झालेले आहेत यांच्या नावे एक फलक किंवा शिला लावली जाणार आहे. तसेच शहरातील स्वतंत्रता सेनानी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

Nigdi : एसपीएम इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल येथे क्रांती दिन उत्साहात साजरा

14 ऑगस्ट विभाजन विभिषिक स्मृती दिवस या कार्यक्रम अंतर्गत देशाच्या फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले. त्या सर्वाना श्रद्धांजली वाहून 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पाळला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त चाफेकर वाडा ते चाफेकर चौक अशी मुक मिरवणूक काढली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.