Charholi : चऱ्होली खुर्दमधील बाह्यवळणाच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज : चऱ्होली खुर्द येथील बाह्यवळण (Charholi) मार्गावरील रस्त्यावर काही ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले असून वाहन चालवण्यास त्या ठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्या खड्ड्यांमुळे त्या रस्त्यावर रहदारी करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

तेथून वाहनांने प्रवास करताना ते खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. त्या रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचून त्या खड्ड्यातून पाणी रस्त्यावर वाहताना दिसून येत होते.

Chinchwad : क्रांतिकारकांचे बलिदान उजागर करण्यासाठी शहरात विविध उपक्रम

बाजूलाच दुसऱ्या ठिकाणी ही रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याचे चित्र (Charholi) दिसून येत आहे. त्या खड्ड्यामुळे सुद्धा वाहनचालकास रहदारी करताना अडथळे निर्माण होत आहे. चऱ्होली खुर्द येथून चऱ्होली बुद्रुककडे जाणाऱ्या पुलाजवळील त्या रस्त्यावर सुद्धा लहान खड्डे (चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत) पडलेले आहेत.

तेथील खड्डे संबंधित प्रशासनाने त्वरित बुजवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.