Chiplun News : जिल्हास्तरीय स्पर्धेत एलीट फिटनेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

एमपीसी न्यूज – चिपळूण मधील डेरवण याठिकाणी नुकतीच विविध खेळांची जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड मधील एलीट फिटनेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत एकूण 37 पदकं मिळवली.

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने 24 ते 31 मार्च दरम्यान हि स्पर्धा आयोजित केली होती‌. दहा, बारा व चौथा वयोगटात एलीट फिटनेस अकॅडमीच्या मुला-मुलींनी 15 गोल्ड, 9 सिल्वर, 13 ब्राँझ अशी एकूण 37 पदकं मिळवली. आंतरराष्ट्रीय जिम्नास्टिक श्रद्धा तळेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले‌.

सहभागी स्पर्धकांना एलिट फिटनेस अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज काळे, प्रिया जोशी, मोनिका काळे, लक्ष्मण नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.