Pimpri Corona Update : अत्यंत गंभीर; पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 2 हजार 275 रुग्णांची भर; 13 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 28) 2 हजार 275 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 286 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनामुळे 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 34 हजार 541 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 16 हजार 177 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पिंपरी (पुरुष, 70 वर्ष), पिंपरी (पुरुष, 60 वर्ष), थेरगाव (पुरुष, 78 वर्ष), वाकड (पुरुष, 81 वर्ष), भोसरी (महिला, 68 वर्ष), चिंचवड (पुरुष, 84 वर्ष), पिंपळे निळख (पुरुष, 59 वर्ष), चिखली (पुरुष, 64 वर्ष), पिंपरी (महिला, 60 वर्ष), आकुर्डी (महिला, 85 वर्ष), आकुर्डी (महिला 79 वर्ष), च-होली (महिला, 43 वर्ष), हडपसर (महिला, 49 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 973 तर शहराच्या बाहेरील 830 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 16 हजार 391 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 13 हजार 748 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 2 हजार 643 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 74 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 हजार 430 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 1 हजार 420 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 1 लाख 23 हजार 470 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.