Pune : नगर रस्त्यावर चालत्या बसला आग; बस जळून खाक

21 प्रवाशांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – पुणे-नगर रोडवरून नागपूरला जाणा-या एका खाजगी बसला आग लागून बस जळून खाक झाली. रामवाडी जकात नाक्याजवळ सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व 21 प्रवासी सुखरूप असून सामानाचे नुकसान झाले. 

अग्नीशामक दलाचे जवान सुभाष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआरएल या खाजगी कंपनीची बस संगमवाडी येथून नागपूरला जाण्यासाठी निघाली होती. बस रामवाडी जकातनाका येथे आली असता सेंट्रल एसीत शॉट सर्किट झाल्यामुळे बसमध्ये आग लागली. प्रवाशांना ही बाब लक्षात येताच चालक वाहकांसह सर्व 21 प्रवाशी तातडीने खाली उतरले. मात्र, अल्पावधीतच आग मोठ्या प्रमाणात भडकली.

दरम्यान, अग्निशामक दलाला याची साडेआठ वाजता माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान दोन गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 20 मिनिटात आग विझवली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांच्या सामानासह बस जळून खाक झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.