Eknath Shinde : …तर पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज : 3.5 ते 4 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला तर पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपा प्रसंगीच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या द्वैवार्षिक अधिवेशन कालपासून पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव मधील शंकर अण्णा गावडे कामगार भावनात चालू आहे. या समारोप कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे मिलिंद अष्टीकर विनोद जगदाळे, अरुण उर्फ नाना कांबळे, सुनील लोणकर बाळासाहेब ढसाळ, अनिल वडघुले व इतर उपस्थित होते.

पुण्यातील वाहतूक समस्या विषयी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ” एका दिवशी रात्री मी साताऱ्याला जात असताना माझी गाडी चांदणी चौक येथील वाहतूक कोंडी मध्ये अडकली. (Eknath Shinde) मी तेथील लोकांशी संवाद साधला. त्यांनी मला त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर त्या चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला व वाहतूक कोंडी आता कमी झाली आहे.

शिंदे पुढे म्हणाले की युनिव्हर्सिटी चौकामध्ये व कात्रज चौकामध्ये महादेव कोंडी होत असते. त्यामुळे 3.5 ते 4 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधल्यावर वाहतूक समस्या दूर होईल.

Pune News : सोशलमिडीयाद्वारे अंमली पदार्थ विक्री कऱणाऱ्या दोघांना अटक

ते म्हणाले की राज्य शासन नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग बांधत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानचे या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग प्रकल्प ‘गेम चेंजर प्रोजेक्ट,’ आहे. 10 ते 14 जिल्ह्यांना प्रत्यक्ष व प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. (Eknath Shinde) या महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच शेकडून शिकत आहे मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आली आहेत. या महामार्गामुळे राज्यातील विविध भागातील लोकांना जेएनपीटी बंदर जवळ येईल. दळणवळण चांगले असेल तर राज्याची प्रगती होते.

शिंदे म्हणाले की मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. अशी पाहणी मी काही दिवसांपूर्वी केलेली आहे. जगातला सर्वात रुंद टनल बांधला जाणार आहे. (Eknath Shinde) त्याचे काम एक वर्षात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून पुण्याला व पुण्याहून मुंबईला लवकर जाता येईल. तसेच यामुळे इंधनाची बचत होईल व प्रदूषण कमी होईल.

अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेश लांडगे पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हा अधिकारी डॉ. राजेश नाईक, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,  किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, नाना कांबळे, सुनील लोणकर, बाळासाहेब ढसाळ, अनिल वडघुले आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.