Pune market yard : कांदा, हिरवी मिर्ची, शिमला मिर्चीच्या भावात घट

एमपीसी न्यूज : गुलटेकडी मार्केटयार्डात आज कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची व कोबीच्या भावात घट झाली. तर, अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(Pune market yard)राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

परराज्यांतून झालेल्या भाजी पाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून शेवगा २ टेम्पो, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, मध्यप्रदेशातून १२ ते १३ टेम्पो मटार, कर्नाटकातून
पावट्याची २ ते ३ टेम्पो आवक झाली आहे़  तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ते १० ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० पोती, टोमॅटो आठ ते नऊ हजार क्रेटस, गवार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी
मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा ५० ते ६० ट्रक, आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा ५० ते ५२ ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-२००, बटाटा : १४०-२२०. लसूण : १५०-५००, आले सातारी : १००-४००, भेंडी : २५०- ४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१६०- १८०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१८०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ३५०-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी:२००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ५००-५५०, मटार : परराज्य: ६००-६५०, पावटा : ५००- ५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०- १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

Pimpri News : “रमाई भीमराव आंबेडकर” स्मारकासाठी पिंपरीतील जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

कोथींबीर, मेथी, पालक महाग

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात आज गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदीना, मुळे, राजगिरा, चुका आणि पालकच्या भावात वाढ झाली.(Pune market yard) चाकवत, अंबाडी आणि चवळईच्या भावात घट झाली. कोथिंबीरच्या सव्वा लाख गड्ड्यांची आवक झाली तर मेथीच्या ५० हजार गड्ड्यांची आवक झाली. कोथींबीरीच्या भावात गेल्या आठवड्यापेक्षा रविवारी गड्डीमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे तसेच मेथी आणि मुळा प्रत्येकी चार रुपये, शेपू, कांदा पात, पुदीना आणि चुका प्रत्येकी दोन रुपये, करडई, राजगिरा आणि पालक प्रत्येकी एक रुपयाने महागला आहे तर चाकवत, अंबाडी आणि चवळई प्रत्येकी एक रुपयांनी स्वस्त झाली आहे़.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १२००-१६००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१६००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : ६००-१३००.

लिंबू, पपई खरबूजचे दर वाढले

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात आज लिंबू, पपई आणि खरबूजाच्या भावात वाढ झाली. पेरुच्या भावात मात्र घट झाली आहे तर अननस, डाळींब, संत्रा, मोसंबी बोरे, चिक्कू, कलिंगड आणि सीताफळाचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लिंबाच्या भावात गोणीमागे ५० रुपये, पपई आणि खरबूज प्रतिकिलोस पाच रुपयांनी महागले आहे तर पेरुच्या भावात क्रेटमागे १०० रुपयांनी घट झाली आहे़.

लिंबू दीड ते दोन हजार गोणी,  डाळिंब सुमारे २५ ते ३० टन, पपई ८ ते १० टेम्पो, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज सुमारे ६ ते ७ टेम्पो, पेरु १ हजार ते दीड हजार के्रट, अननस ५ ट्रक, मोसंबी ३० ते ४० टन, संत्रा २० ते २५ टन, सीताफळ ६० ते ७० टन, चिक्कू दीड हजार बॉक्स इतकी आवक झाली होती़.

फळांचे भाव : लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-२५०, आरक्ता: ३०-८०, गणेश : २०-६०, कलिंगड : १५-२५, खरबूज : २०-३५, पपई : ५-२५, अननस (एक डझन) १००-४५०, पेरु (२० किलो) २००-
३००़ मोसंबी (तीन डझन) २५०-५००, (चार डझन) १५०-२५०, संत्रा  (दहा किलो) २००-६००, सीताफळ  (एक किलो) २०-७०, चिक्कू  (१० किलो)१००-५००़

 

फुलांना मागणी वाढली

मागील काही दिवसांपासून फुलबाजारात मंदीचे वातावरण होते. पण, काही दिवसांपासून मार्गशीर्ष महिना सुरु होत असल्याने फुलबाजारात काहीशी मागणी वाढत चालली आहे़.  शोभीवंत फुलांना चांगली मागणी आहे़ तर इतर फुलांची मागणी वाढत आहे.

प्रतिकिलोचे दर : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी : १०- २०, कापरी : २०-३०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडीकाडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ६०-२२०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : १५०-२००़

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.