Pune News : सोशलमिडीयाद्वारे अंमली पदार्थ विक्री कऱणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज सोशल मिडीयाद्वारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सिंहगड रोड योथून अटक केली आहे. (Pune News) ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि.19) ब्रम्हा हॉटेलजवळ केली आहे.

आकाश महेंद्र ठाकर (वय 22 रा.हिंगणे) व अनिकेत जनार्दन धांडेकर (वय 20 रा. हिंगणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

AAP : राज्यपाल कोशारी यांना पदमुक्त करा: आप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना आरोपी संशयीत रित्या थांबलेले पोलिसांना दिसले.(Pune News) यावेळी पोलिसांनी आकाश याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 47 हजार 650 रुपयांचे 47 ग्रॅम 650 मिलीग्रॅंम वजनाचे चरस, मोबाईल व दुचाकी पोलिसांनी जप्त केली तर अनिकेत याच्याकडून पोलिसांनी 86 हजार 400 रुपयांचे 5 ग्रॅम 760 मिलीग्रॅम एमडी व एक आयफोन असा दोघांकडून 2 लाख 14 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी हे अंमली पदार्थ अज्ञाताकडून विकत घेतले होते. ज्याची ते पुणे शहरात विक्री करणार होते. आरोपींवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.