Pune Corona Update : दिलासादायक ! पुणे शहरात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, आज 840 नवे रूग्ण

एमपीसी न्यूज  : पुणे शहरातील कोरोनाचा आलेख उतरू लागला आहे.  गेल्या काही दिवसांपासून शहरात एक हजाराच्या   खाली कोरोनाबाधित सापडत आहेत. गेल्या 24 तासात शहरातील  840 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून तब्बल 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 949 रूग्ण  कोरोनामुक्त झाले आहेत.  मृतांमध्ये  पुण्यातील 40 आणि पुण्याबाहेरील 23 जणांचा समावेश आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 64 हजार 916 वर पोहचला आहे. त्यामध्ये दिलासादायक बाब अशी की आतापर्यंत तब्बल 4 लाख 44 हजार 618 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 12 हजार 330 सक्रिय रूग्ण आहेत.

एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 309 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 7 हजार 968 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 11 हजार 380 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 840 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.