Maharashtra Corona Update : राज्यात आज 26,133 नवे रुग्ण, 40,294 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शनिवारी, दि.22) 26 हजार 133 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 40 हजार 294 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 55 लाख 53 हजार 225 एवढी झाली आहे. त्यापैकी 51 लाख 11 हजार 095 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 52 हजार 247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात 682 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 87 हजार 300 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.57 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 92.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 23 हजार 361 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 27 लाख 55 हजार 729 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 22 हजार 103 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.