Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 नव्या रुग्णांची नोंद; 19 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज, शनिवारी 13 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, बरे झालेल्या 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मामुर्डी येथील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या 122 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शनिवारी (दि.22 ) सायंकाळी सव्वा पाच वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालानुसार आज कळालेला 50 वर्षीय महिलेचा मुत्यू हा 17 मे रोजी नोंद झालेला आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2700 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 516 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

हद्दीत आजवर 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 122सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 25 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 59 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर, 38 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

आज आढळलेले नवीन रुग्ण

चिंचोली (5), गांधी नगर (2), थॉमस कॉलनी (1),शेलारवाडी (1), किन्हई (1), शीतलानगर नं 1(3).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.