Corona Update : महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट 92.04 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 55 लाख 53 हजार 225 कोरोनाबाधीत आढळले. यापैकी 51 लाख 11 हजार 95 जण बरे झाले. यामुळे रिकव्हरी रेट शुक्रवारच्या 91.74 टक्क्यांवरुन शनिवारी 92.04 टक्क्यांवर पोहोचला. डेथ रेट जैसे थे तर पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 87 हजार 300जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधितांपैकी 2 हजार 583 जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. यामुळे डेथ रेट 1.57 टक्के आहे. शुक्रवारीही राज्याचा डेथ रेट अर्थात मृत्यू दर एवढाच होता.

महाराष्ट्रात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 23 हजार 361 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 55 लाख 53 हजार 225 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 16.97 टक्क्यांवर आला. याआधी शुक्रवारी राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 17.04 टक्के होता.

मागील 24 तासांत राज्यात 26 हजार 133 नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 40 हजार 294 जण मागील 24 तासांमध्ये बरे झाले. तसेच राज्यात कोरोनामुळे 24 तासांमध्ये 682 मृत्यू झाले. याआधी शुक्रवारी राज्यात 29 हजार 644 नवे कोरोना रुग्ण आढळले आणि 44 हजार 493 बरे झाले होते. तसेच शुक्रवारी राज्यात 555 मृत्यू झाले होते.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 52 हजार 247 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 27 लाख 55 हजार 729 जण होम क्वारंटाइन आहेत तर 22 हजार 103 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

मुंबई६,९५,४८३६,५०,६९११४,५१६२,०४४२८,२३२
ठाणे५,५५,७६९५,२२,५०९७,८९२३१२५,३३७
पालघर१,१०,६९८१,००,१५०१,६७११२८,८६५
रायगड१,४३,०३५१,३४,३१४२,६४१६,०७८
रत्नागिरी३८,६८७३१,१४४८०४६,७३७
सिंधुदुर्ग२१,७६०१७,२८०५५९३,९१३
पुणे९,९६,१११९,३०,७८७११,०६८५८५४,१९८
सातारा१,४५,९४३१,२५,५२३२,७०९१५१७,६९६
सांगली१,१४,९८६९४,४६०२,६०५१७,९१८
१०कोल्हापूर९७,९६८८१,१६६३,०९८१३,७०१
११सोलापूर१,५२,९५४१,३१,०७४३,७२०६५१८,०९५
१२नाशिक३,७७,७००३,५७,२०६४,२५३१६,२४०
१३अहमदनगर२,३७,६८५२,१७,३००२,६२९१७,७५५
१४जळगाव१,३५,००९१,२४,८१३२,२९८३२७,८६६
१५नंदूरबार३८,४४०३६,३०८७७९१,३५०
१६धुळे४३,९६४४०,३८४५०७१२३,०६१
१७औरंगाबाद१,४३,५९२१,३४,३६९२,५१२१४६,६९७
१८जालना५६,३०८५०,२५४८७७५,१७६
१९बीड८१,३५५७०,११२१,७०५९,५३०
२०लातूर८७,५३४८१,१६४१,५५४४,८१२
२१परभणी४८,६६४४३,१६४८६४११४,६२५
२२हिंगोली१७,२६५१४,८९५३०७२,०६३
२३नांदेड८८,८२१८३,२६६२,०८८३,४६०
२४उस्मानाबाद५४,५३६४७,६५५१,२३७५५५,५८९
२५अमरावती८४,९७५७४,३८४१,२९३९,२९६
२६अकोला५३,३३९४६,२४१८२३६,२७१
२७वाशिम३७,६१६३३,३८५४९१३,७३७
२८बुलढाणा७३,४६८६८,४०२४५०४,६११
२९यवतमाळ६८,९००६३,७१११,२६८३,९१७
३०नागपूर४,८५,३८७४,६०,४७९६,३७७४९१८,४८२
३१वर्धा५६,००५५०,८२८७८५८६४,३०६
३२भंडारा५८,२४९५५,६९५७२७१,८१८
३३गोंदिया३९,४५८३७,२६७४२२१,७६२
३४चंद्रपूर८३,९६९७५,५३०१,३०४७,१३३
३५गडचिरोली२७,४४६२५,१८५३४९१८१,८९४
इतरराज्ये/ देश१४६११८२६
एकूण५५,५३,२२५५१,११,०९५८७,३००,५८३,५२,२४७

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.