Pimpri : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंपनी बसची मेट्रो डिव्हायडर धडक

एमपीसी न्यूज – बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची मेट्रोच्या डिव्हायडरला धडक बसली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास खराळवाडी येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

कान्हे फाटा येथील टिव्हीएस लॉजीस्टिक कंपनीमध्ये साहेबराव यशवंत दराडे (वय 51, रा. केसनंद) हे चालक म्हणून काम करतात. आज दुपारी तीन वाजता कंपनीतील 45 कर्मचा-यांना घेऊन ते कंपनीच्या बस (एम एच 14 / जी यू 0200) मधून वाघोली येथे जात होते. चारच्या सुमारास बस पिंपरी येथे आली. पिंपरी पासून मेट्रोचे काम सुरू आहे. त्या कामासाठी मेट्रोच्या बॅरिगेट लावले आहेत. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुढे ग्रेड सेपरेटर मधून बस आली असता दराडे यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस मेट्रोच्या बॅरिगेटला जाऊन धडकली.

या धडकेमुळे मेट्रोच्या चार बॅरिगेटचे नुकसान झाले. तसेच बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामुळे कामगारांना मात्र बराच वेळ ताठकळत रस्त्यावर थांबावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.