BNR-HDR-TOP-Mobile

Kalewadi : कस्पटेवस्ती येथील अर्धवट सीमाभिंतीचे काम पूर्ण

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कस्पटेवस्ती येथे काळेवाडी फाट्याजवळ प्राधिकरण आरक्षित रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भूखंडाच्या सीमाभिंतीचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात आले. तसेच रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे, पार्किंग, वाळूच्या गाड्या, ट्रॅवल्सच्या गाड्या हटविण्यात आल्या. या कामासाठी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी पाठपुरावा केला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील संबंधित विभागाला सूचना दिल्या. मागील आठवड्यात प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी अधिका-यांसह याची पाहणी केली. त्यानंतर अखेर आज या ठिकाणी अर्धवट सीमाभिंत पूर्ण करण्यात आली तसेच येथील अतिक्रमणे ही हटविण्यात आली.

कस्पटे वस्ती येथे प्रवेश करताना सुरुवातीलाच येथील बकालपणामुळे परीसरातील लहान मुले-मुली, महिला भगिनी व नागरिक यांना येथून जाताना कचरा, दुर्गंधी, रस्त्यापर्यंत आलेली अनधिकृत वाहणे, टप-या तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी दारु पिणारे यामुळे जो त्रास होत होता तो कायमस्वरुपी संपला आहे. परीसरातील येथून ये-जा करणा-या नागरिकांनी आता नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला असेल.

या मोकळ्या जागेत महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे खेळाचे मैदान, विरंगुळा केंद्र व्हावे ही मागणी नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे यांनी केली आहे. संबंधित विभागाशी याचा पाठपुरावा सुरु आहे.

HB_POST_END_FTR-A1
.