Dadu Indurikar : वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद

एमपीसी न्यूज – वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा ( Dadu Indurikar) मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवारी (दि. 16 मार्च) नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान” या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल आणि दर्शन थियटर निर्मित “गाढवाचं लग्न” या विनोदी वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे.

राज्यामध्ये विविध भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. समृद्ध अशा लोक परंपरेने नटलेले राज्य आहे. वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती व लोकसंस्कृती विविध प्रदेशानुसार  बदलत गेलेली दिसून येते. नमन, दशावतार,  तमाशा शाहिरी, कलगीतुरा, जाखडी खेळे इत्यादी लोककला प्रकार अस्तित्वात आहेत. यापैकी तमाशा कलेतील वगनाट्याचा बादशाह म्हणजे दादु इंदुरीकर. महाराष्ट्राला लोककलावंतांची मोठी परंपरा. आजवर अनेक सोंगाडे झाले पण एकच गाजला आणि लोकांच्या गळ्यातला ताईत बनला असा महान विनोदसम्राट, वगसम्राट दादू इंदुरिकर. गावातला तमाशा शहरातल्या नाकं मुरडणाऱ्या पांढरपेशी लोकांना पाहायला भाग पाडणारा अवलिया म्हणजे दादू इंदुरीकर.

Today’s Horoscope 14 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दादू इंदुरीकर यांच्या जयंतीनिमित्त 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून यू. एस. जी. जिमखाना हॉल, नाशिक रोड, नाशिक येथे  सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद आयोजन करण्यात आलेले असून “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान” असे या परिसंवादाचे स्वरूप आहे.

या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, प्रभाकर ओव्हाळ, प्रा.डाॅ.गणेश चंदनशिवे, सोपान खुडे, ज्ञानेश महाराव, ॲड. रंजना भोसले, खंडुराज गायकवाड सहभागी होणार आहेत.

तसेच यावेळी  श्री साई फ्रेडं सर्कल व दर्शन थियटर निर्मित दादू इंदुरीकर यांचे अजरामर “गाढवाचं  लग्न” या वग नाट्याचे सादरीकरण  होणार आहे.  नव्या पिढीसाठी  असणारे हे वगनाट्य निर्माता / दिगदर्शक संजय चव्हाण, सुरेश धोत्रे, राजेंद्र ( सरोदे) इंदुरीकर यांनी बसवले असून त्याची निर्मिती सकंलन वसंत अवसरीकर यांनी केले आहे. रसिक प्रेक्षकानी शासनाच्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे  ( Dadu Indurikar)  यांनी केले आहे..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.