Dapodi : घरफोडी करून 57 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घराचे कुलूप तोडून घरातून 49 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा एकूण 57 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दापोडी येथे उघडकीस आली.

अविनाथ शामराव थरथरे (वय 73, रा. मंत्री निकेतन, एसटी रोड, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाथ 27 जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास घराला कुलूप लावून गावी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 49 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा एकूण 57 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

फिर्यादी अविनाथ 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.