Chinchwad : दरवाजाचा कडीकोंयडा उचकटून चिंचवडमध्ये तीन लाखांची घरफोडी!

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोंयडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 95 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दळवीनगर, चिंचवड येथे 25 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत सोमवारी (दि. 2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा प्रशांत दाते (वय 44, रा. सन्मान अपार्टमेंट, दळवीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी पूजा यांनी आपला वरच्या मजल्यावरील फ्लॅट बंद करून त्या आई व मुलांसह खालील मजल्यावर झोपण्यासाठी गेल्या. 25 फेबुवारी रोजी पहाटे पावणेतीन ते सव्वातीन वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला.

घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख 90 हजार 500 रुपयांचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख पाच हजार रुपये, असा एकूण दोन लाख 95 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.