Hinjawadi : डोक्यावरून चाक गेल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डोक्यावरून ट्रक चे चाक गेल्याने एका 37 वर्षीय (Hinjawadi) महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.13) हिंजवडी फेज2 येथे घडला आहे.

ज्योती जोयल चोंडिकर (वय 37) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी (Hinjawadi) नीरज दीपक लखन (वय 31) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : चंद्रकांत शेटे यांना डाॅ अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण ज्योती या दुचाकीवरून थेरगाव येथे त्यांच्या घरी जात होत्या. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयी ने व भरधाव गाडी चालवून ज्योती यांच्या गाडीला धडक दिली. यात ज्योती या खाली पडल्या यावेळी त्यांच्या डोक्यावरून ट्रक चे पाठीमागं चे चाक गेले. यात त्या गंभीर जखमी झाल्या व त्यात त्यांच्या मृत्यू झाला. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.