Pune : पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई; चार घुसखोरांना अटक तर 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : केंद्रीय तपास यंत्रणा व पुणे शहर पोलिसांनी (Pune) बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई केली असून 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे घुसखोर भारतात बेकायदेशीर प्रवेश करून विनापरवाना वास्तव्य करत होते. यांच्याकडून पोलिसांनी बनावट कागदपत्र, भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त केले असून एकूण 11 बांगलादेशी नागरिकांवर हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 ऑगस्ट 2021 रोजी सेंट्रल एजेन्सी द्वारे माहिती प्राप्त झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सर्व संशियतानी आपण बांगलादेशी असल्याचे मान्यही केले. तसा स्टेशन डायरी रिपोर्ट ही नोंद झाला.

Pune Railway : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे स्थानकावरून 28 विशेष रेल्वे सुटणार

तरीही संशयित विदेशी नागरिकांकडे ते बांगलादेशी असल्याचा पुरावा नाही असे अजब कारण देऊन हडपसर पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या सर्व सात बांगलादेशी घुसखोरांना चक्क सोडून दिले होते.

मात्र Military Intelligence तपास करून यापैकी काही बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सबळ पुरावे जमवले. त्याआधारे 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक झालेली आहे व त्यांच्या पुण्यात विनापरवाना राहणाऱ्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी 3 संशयितांना ऑगस्ट 2021 दरम्यान पुणे पोलिसांनी चौकशी करून सोडले होते.

बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणुन त्यांना (Pune) भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी मिळवून देण्याचे मोठे रॅकेट उघड झाले आहे.

काही अटक आरोपी भारतात कमावलेले पैसे संशयित मार्गाने पद्धतशीरपणे बांगलादेशात पाठवत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.