Pune Railway : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे स्थानकावरून 28 विशेष रेल्वे सुटणार

एमपीसी न्यूज – आगामी दिवाळी, छठ पूजा या सणांच्या (Pune Railway) पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एकूण 74 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 17 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावरून 28 विशेष रेल्वे सुटणार आहेत.

पुणे जंक्शन – अजनी वातानुकूलित सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी (14 फेऱ्या) – (20 एलएचबी कोच)

विशेष गाडी (02141) 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी दुपारी 03.15 वाजता पुणे जंक्शन येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी पहाटे 04.50 वाजता अजनी रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

विशेष गाडी (02142) 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत (Pune Railway)प्रत्येक बुधवारी सायंकाळी 07.50 वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगांव, वर्धा स्थानकावर थांबेल. या गाडीला तीन वातानुकूलित 2 टियर, 15 वातानुकूलित 3 टियर आणि दोन जनरेटर कार (एकूण 20 एलएचबी कोच) असेल.

Talegaon Dabhade : चंद्रकांत शेटे यांना डाॅ अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार प्रदान

पुणे – गोरखपुर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी (14 फेऱ्या) – (22 आईसीएफ कोच)

विशेष गाडी (01431) 20 ऑक्टोबर ते 01 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी दुपारी 04.15 वाजता पुणे जंक्शन येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 09.00 वाजता गोरखपुर स्थानकावर पोहोचेल.

विशेष गाडी (01432) 21 ऑक्टोबर ते 02 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी रात्री 11.25 वाजता गोरखपुर येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी 06.25 वाजता पुणे येथे पोहोचेल.

ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, कानपुर, लखनऊ, गोंडा, मनकापुर, बस्ती, खलीलाबाद या स्थानकावर थांबेल. या गाडीला एक वातानुकूलित -2 टियर, चार वातानुकूलित -3 टियर, 11 स्लीपर कोच, 6 सामान्य द्वितीय श्रेणी यात दोन सामान कम गार्ड ब्रेक व्हॅन (एकूण 21 आईसीएफ कोच)असेल.

विशेष रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण रविवार (दि. 15) पासून सुरु होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.