Talegaon Dabhade : पुरस्काराने जबाबदारी वाढली – चंद्रकांत शेटे

चंद्रकांत शेटे यांना डाॅ अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार प्रदान

एमपासी न्यूज – डॉ. अशोक शीलवंत यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात(Talegaon Dabhade) फार मोठे सामाजिक काम केले आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. डॉ.अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार देवून मला सन्मानित केले या बद्दल या संस्थेचे मी ऋण व्यक्त करतो व या पुरस्काराचा नम्रपणे स्विकार करतो. पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून शिक्षण क्षेत्रात आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याचे बळ मिळाले आहे, असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.

अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या वतीने पिंपरीतील (Talegaon Dabhade)आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित स्मृतिशेष डॉ.अशोक शिलवंत यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा झाला. सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा डाॅ अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार मावळमधील शिक्षणप्रेमी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शेटे बोलत होते.

Chikhali : बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपये चोरीला

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस,खासदार श्रीनिवास पाटील,’लोकमत’चे संपादक संजय आवटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे,माजी नगरसेविका डॉ.सुलक्षणा शीलवंत-धर,ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के,ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांना डॉ.अशोक शिलवंत धम्मदीप पुरस्कार,माजी आमदार जयदेव गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार,पत्रकार अरुण खोरे यांनापत्रकारभूषण,भाऊसाहेब डोळस, चंद्रकांत शेटेयांना विद्याभूषण,स्वाती सामक यांना काव्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

पुरस्काराला उत्तर देताना चंद्रकांत शेटे पुढे म्हणाले की,आज डॉ.अशोक शिलवंत विद्याभूषण पुरस्कार देवून मला सन्मानित केले याबद्दल या संस्थेचे मी ऋण व्यक्त करतो व या पुरस्काराचा नम्रपणे स्विकार करतो. खरे म्हणजे डॉ.अशोक शिलवंत यांचे पिंपरी चिंचवड परीसरामध्ये फारमोठे काम व योगदान राहिलेले आहे. साहित्यिक,सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेकांना मदत केलेली आहे.अशोक नागरी सहकारी बँकेची स्थापना करून गोर गरिबांसाठी बँकेच्या माध्यमातून कार्य केले आहे.

तसेच मी देखील जनता सहकारी बँकेतून सेवा निवृत्त झालो आहे. त्यामुळे शिलवंत यांचे कार्य आमच्या समोर आदर्श आहे.त्यांच्या मागे त्यांची मुलगी नगरसेविका डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर व मुलगा राजरत्न शिलवंत हे त्यांचे कार्यपुढे नेत आहेत हे देखील अभिमानास्पद आहे. त्या निमित्ताने या दोघांचेही मी आभार मानतो.

मी शिक्षण क्षेत्रात मागील दहा वर्षापासून काम करत आहे. या क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी
षकेंद्रबिंदू मानून अनेक संस्थांमध्ये काम करण्याचे भाग्य मला लाभले. 1974 मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचा सभापती म्हणून काम करताना व त्यानंतर बालविकास संस्थेचा15 वर्षापासून अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहे. तसेच इंद्रायणी विद्या मंदिर या आचार्य प्र. के. अत्रे यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये देखील अनेक वर्ष संचालक म्हणून मी काम पाहात आहे.

माझ्या या कार्याची दखल घेवून आपण मला हा अत्यंत मानाचा असा विद्या भूषण पुरस्कार देवून
सन्मानित केले. हा पुरस्कार मी शिक्षण क्षेत्रात काम करणा-या आमच्या मावळ तालुक्याचे प्रेरणास्थान व आमचे आधारस्तंभ शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे साहेब यांना अर्पण करत असल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.