Chikhali : बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपये चोरीला

एमपीसी न्यूज- पुणे मनपा भवन ते चिखली हा पीएमपीएमएलचा (Chikhali) प्रवास करत असताना एका 77 वर्षीय नागरिकाचे एक लाख रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी बसमध्ये घडली.

याप्रकरणी रमेश केशव खांबेटे (वय 77 रा वल्लभनगर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून भोसरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : तरुणावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना शस्त्रासह अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे मनपा भवन ते (Chikhali) चिखली असा पीएमपीएल बस प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांच्या बागेतून चोरट्याने त्यांच्या परस्पर हातचालखिने बागेतील एक लाख रुपये चोरले.

चोरी झाल्याचे लक्षात येतात रमेश खांबेटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून भोसरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.