Talegaon Dabhade : तरुणावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या (Talegaon Dabhade) चौघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (12) सायंकाळी तळेगाव चाकण रोडवरील प्यासा प्यासा बार अँड रेस्टॉरंट जवळ केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शुभम अनिल भोसले (वय 26) साईराज कैलास शेवकर (वय 19) सूर्यकांत धनराज माने ( वय 19 ) सागर विठ्ठल वारे (वय 20 ) चौघेही राहणार तळेगाव दाभाडे यांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

Maval : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला नॅककडून “B” ग्रेड मानाकंन प्राप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले व साहिल म्हाळसकर यांच्यात (Talegaon Dabhade)दोन दिवसापूर्वी भांडण झाले होते. याच रागातून बदला घेण्याच्या उद्देशाने शुभम भोसले व त्याचे साथीदार हे साहिलवर हल्ला करणार होते. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना याची खबर लागली .

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात आरोपींना इर्टिगा कार सह अटक केली. यामध्ये पोलिसांनी आरोपींकडून पाचशे रुपयाचा कोयता व तीनशे रुपयांचा एक चाकू देखील जप्त केला आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपींवर हल्ला करण्याचा कट व बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.