Maval : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला नॅककडून “B” ग्रेड मानाकंन प्राप्त

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय (Maval)तळेगाव-दाभाडेला नॅक कडून “B” ग्रेड मानाकंन प्राप्त झाले आहे. मावळ तालुक्यातील मुलींसाठी असणारे हे एकमेव महाविद्यालय आहे.

नॅक बंगळूर कडून डॉ.मनिमेकलाई कालीधासन ( तमिळनाडू ), डॉ.मुफ्फीद अहमद ( जम्मू काश्मीर ) आणि डॉ.अनुप कुमार  (पंजाब) या त्रिसदस्यीय समितीकडून 3 व 4 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाची सर्व प्रकारची पाहणी करण्यात आली होती.पहाणीनंतर शुक्रवारी (दि.13) नॅक कडून महाविद्यालयाला “B” ग्रेड मानांकन प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Chinchwad : चिंचवड येथे रंगणार नवरात्र महोत्सव; भाविकांना भव्य मंदिर प्रतिकृतीतून मिळणार साडेतीन शक्तीपीठ दर्शन

या सर्व प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीहरी मिसाळ , नॅक समन्वयक प्रा.सोमनाथ कसबे सर्व प्राध्यापक , प्राध्यापकेतर (Maval) कर्मचारी, विद्यार्थिंनिंनी विशेष परिश्रम घेतले.

या यशाबद्दल मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सुनिल शेळके, सचिव यादवेंद्र खळदे , खजिनदार नंदकुमार शेलार , सहसचिव प्रा.वसंत पवार तसेच सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.