Maval : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या महामार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या मंदिर (Maval) परिसरात 15 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत असल्याने यात्रा कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जड, अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

वेहेरगांव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा ( Maval ) मंदिर दरम्यान 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. 21 ते 23 ऑक्टोबर या 3 दिवसाच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगाव बुद्रुक टोलनाका – वडगाव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा – कुसगाव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूकडे जातील.

Chinchwad : चिंचवड येथे रंगणार नवरात्र महोत्सव; भाविकांना भव्य मंदिर प्रतिकृतीतून मिळणार साडेतीन शक्तीपीठ दर्शन

21 ते 23 ऑक्टोबर या 3 दिवसाच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन वडगांव तळेगाव फाटा – लोणावळा – मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबई बाजूकडे जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.