Dapodi : ‘सीएमई’मधील महिला अधिकारी वसाहतीत लष्करी वेशात चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीएमई) महिला अधिकारी वसाहतीमध्ये एका अज्ञात इसमाने फौजीच्या वेशात येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला. अधिकारी महिलेने चोरट्याला बघितल्याने त्याचा डाव उलटला आणि तो पसार झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास महिला अधिकारी वसाहतीमधील खोली क्रमांक एक येथे घडली.
_MPC_DIR_MPU_II
हिमांशी गोपीचंद चौहान (वय 23, रा. सीएमई, दापोडी. मूळ रा. गजियाबद, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान सीएमईमध्ये नोकरी करतात. सोमवारी पहाटे महिला अधिकारी वसाहतीमधील खोली क्रमांक एक मध्ये त्या झोपलेल्या असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास एक अज्ञात आरोपी फौजीचा वेश घालून आला. त्याने दरवाजाची जाळी तोडून कडी उघडून खोलीत प्रवेश केला. दरम्यान चौहान यांना जाग आली. आपल्या खोलीत चोर आल्याचे लक्षात येताच त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा चौहान यांच्या हाताला हिसका मारून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1