Daund News : भिमा नदीत सापडली तब्बल दिडशे वर्षांपूर्वीची महादेवाची मूर्ती

एमपीसी न्यूज – भिमा नदीच्या पात्रात तब्बल 150 वर्ष जुनी दगडाची महादेवाची मूर्ती सापडली आहे. एक टन वजनाची ही मूर्ती पाच फूट उंच आहे. महादेवाचा फक्त चेहराच असलेल्या या मूर्तीचे इतर भाग देखील पात्रात सापडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रिटिशांनी दिडशे वर्षापूर्वी दौंड-अहमदनगर लोहमार्गावर दौंड येथे भीमा नदीवर दगडी रेल्वेपूल उभारला होता. त्याच्याच शेजारी भिमा नदीवर दुस-या पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे.

या पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामात शनिवारी महादेवाची मूर्ती सापडली. जेसीबीच्या मदतीने ही मूर्ती बाजूला करण्यात आली.

महादेवाचा फक्त चेहरा असलेली ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आली असावी, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. मूर्तीचे वजन जास्त असल्याने ती वाहत येणं शक्य नाही.

मागील दोन वर्षात भिमेला मोठा पूर देखील आला नाही. त्यामुळे ही मूर्ती याच ठिकाणावरील असावी, असं काही जाणकारंनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.