Dehu Road News : किरकोळ कारणावरून आई व मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण

एमपीसी न्यूज – बघून का हसलास या किरकोळ ( Dehu Road News) कारणावरून लाकडी दांडक्याने आई व मुलाला 4 ते 5 जणांना मारहाण केली आहे. हा प्रकार देहुगाव येथे रविवारी (दि.12) घडला.

याप्रकरणी आकाश संतू दुटे (वय 21 रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोष दादाभाऊ शिंदे , संजय दादाभाऊ शिंदे , संतोषची बहिण व पत्नी व संजयची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Nigdi News : कारसाठी व नवीन कंपनीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची आई व भाऊ यांना फोन करून बोलावून घेत बघून का हसलास कारणावरून आरोपींनी पकडून लाकडी दांडक्याने फिर्यादी, त्यांची आई व मित्र केतुर यांना शिविगाळ करत मारहाण केली. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस ( Dehu Road News) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.