Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 9 रुग्णांची भर; आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या 159

9 patients added to the cantonment area today; The total number of patients till date is 159

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील इंद्रपूरम सोसायटी, पारशी चाळ, मेन बाजार आणि थॉमस कॉलनी या भागात आज, मंगळवारी एकूण 9 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 159 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज 9 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

तर कोरोनातून बरे झालेल्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत हद्दीत एकूण 159 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

यापैकी सध्या 26 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 24 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 40 रुग्ण उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 65  रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.