Pimpri: मृत अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वारसांना सुरक्षा कवच योजनेचा तत्काळ लाभ द्या

Provide immediate benefit of security cover scheme to the heirs of deceased officers and employees : उपमहापौर तुषार हिंगे यांची यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेतील दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या वारसाला विम्यातील सुरक्षा कवच योजनेचा लाभ त्वरीत दिला जावा, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज (मंगळवारी) केली आहे.

उपमहापौर हिंगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाकड माध्यमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र तुपे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील रुग्णालयातील उपलेखापाल सिद्धार्थ जगताप या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या दोन्ही कर्मचार्‍यांना कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे कामकाज करत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

महापालिकेने कोरोना विमा सुरक्षा कवच योजना यापूर्वी जाहीर केली आहे. त्या योजनेअंतर्गत एखादा अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्य बजावित असताना कोरोनामुळे मरण पावल्यास त्याच्या वारसाला 75 लाख रूपये विमा रक्कम मिळेल आणि वारसाला अनुकंपा तत्वावर महापालिकेत नोकरी दिली जाईल, असे जाहीर केले होते.

राजेंद्र तुपे व सिद्धार्ध जगताप हे दोन्ही कर्मचारी आपले कर्तव्य बजावित असताना त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या वारसाला विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम द्यावी.

तसेच त्यांच्या वारसाला महापालिकेत नोकरी द्यावी. मृत कर्मचार्‍यांची पीएफ निधीची रक्कम वारसाला द्यावी, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्तांना केली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. पुणे शहरात कोरोनाचे 39 हजार 203 रुग्ण झाले आहेत.

शहरात ऍक्टिव्ह रुग्ण 14 हजार 757 आहे. 23 हजार 441 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 हजार 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यव नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, मधुमेह, किडनी, हृदयविकार असे अनेक आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.