Dehuroad News : ‘ शेलारवाडी, थॉमस कॉलनीतील रस्त्यांचे डांबरीकरण करा’

नगरसेवक रघुवीर शेलार यांची मागणी

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील वॉर्ड क्रमांक एकमधील रस्ते, गटारी आणि शाळा बांधकामसंदर्भातील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत , अशी मागणी नगरसेवक रघुवीर शेलार यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाकडे केली आहे.

या संदर्भात शेलार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना  निवेदन दिले आहे. यावेळी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे आणि भाजपचे अमोल नाईकनवरे उपस्थित होते.

वॉर्ड क्रमांक एकमधील थॉमस कॉलनी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील एकता सोसायटी आणि आम्रपाली हौसिंग सोसायटीतील रस्त्यांचे डांबरीकरण करावे.

बेगडेवाडी रेल्वे स्थानक ते शेलारवाडी गावापर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी.

शेलारवाडी गावातील स्वामी विवेकानंद शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. त्यासाठीचा प्रस्ताव रक्षा संपदा निदेशालय  पुणे आणि रक्षा संपदा  महानिदेशालय नवी दिल्ली येथे पाठवावा.

कोटेश्वरवाडी येथील मंदिरासमोरील गटाराची तसेच शाळेच्या भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेलार यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.