Dehuroad News : चिंचोलीत महिलांच्या हस्ते वृक्षारोप, सफाई कामगारांना शिधा वाटप

एमपीसीन्यूज : चिंचोली गावामध्ये वटपौर्णिमेनिमित्त दाम्पत्य आणि महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना पै.धनंजय सावंत मित्र परिवारच्यावतीने तुळशीची रोप देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सफाई कामगारांचा अन्नधान्याची किट, व करोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पानसरे, डीएडी डेपोचे माजी चेअरमन पंडित जाधव, पै.धनंजय सावंत,  बोर्डाचे निवृत्त अधिकारी श्रीरंग सावंत, रामभाऊ सावंत, पत्रकार देवराम भेगडे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत, निवृत्ती बालघरे, विनायक दाभाडे, प्रकाश चंदनशिवे, सहादु पानसरे, अनिल सावंत, मारूती सावंत, पुष्पा जाधव, मंगल सावंत, शितल जाधव, योगिता सावंत, लिलाबाई चंदनशिवे आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.