Dehuroad News : देहूरोड येथे काँग्रेसचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचा 136 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच मेन बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

त्याचप्रमाणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक मारीमुत्तू यांच्या संपर्क कार्यालयामध्ये देशाच्या आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या महान हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, महिला शहराध्यक्षा ज्योती वैरागर, अल्पसंख्यांक सेलचे मावळ तालुका अध्यक्ष गफूर शेख, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, कार्याध्यक्ष दीपक सायसर, सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव, वॉर्ड अध्यक्ष संभाजी पिंजण, युवा नेते सायबू तेलगू, विल्सन पालीवाल, तारिक रंगरेज, व्यंकटेश मारीमुत्तू, योगेश टाकळकर, तसेच महिला कार्यकर्त्या गीता रामणारायण, सिंधू शिरसाठ, संगीता वर्धा, तवमनी राजू अम्मावशी, लक्ष्मी नाडार आदींसह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हाजिमलंग मारीमुत्तू गोपाळ तंतरपाळे, गफूर शेख, दीपक सायसर यांनी मनोगतातून काँग्रेसच्या कार्याचा गौरव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.