Alandi : आळंदी गावठाण परिसरात वेळेवर, पुरेसा पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून (Alandi) आळंदीमधील गावठाण भागात (जुने एस टी स्टँड, कुऱ्हाडे आळी, मंदिर परिसर इ.भागात) ठरलेल्या वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील काही नागरिकांनी पालिकेत नाराजी व्यक्त केली. अपुरा पाणीपुरवठा झाल्याने घरगुती वापरासाठी येथील नागरिकांना पाणी राहत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Industrial Power : राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ, औद्योगिक ग्राहकांची संख्याही वाढली

या परिसरात वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील काही कर्मचारी आजारी असल्याने तेथील कार्य दुसरे कर्मचारी करत असल्याने संबंधित यंत्रणेची वेळेची माहिती नसल्याने गावठाणात (Alandi) सकाळी अवेळी व अपुरा पाणीपुरवठा काही दिवस चालू होता. परंतु, आता त्या भागातील पाणीपुरवठा वेळेवर व पुरेसा होईल. याबाबत माहिती पालिका पाणीपुरवठा आधिकारी अक्षय शिरगिरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.