Pune : आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेत नाशिक, नांदेड, औरंगाबादचा विजय

एमपीसी न्यूज : आजपासून सुरु झालेल्या (Pune) आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेत नाशिकने मोठ्या विजयाची नोंद केली. त्याचवेळी नांदेड आणि औरंगाबाद संघांनीही आपल्या मोहिमेस सुरुवात केली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे.

नाशिकने मोठा विजय मिळविताना गडचिरोलीचा 6-0 असा पराभव केला. ओम फडतरेने दुसऱ्या, तर प्रदीप कनोजिया (36वे मिनिट), अनुज लोखंडे (45वे मिनिट), शुभम दायमा (58वे मिनिट), अरुप कुमार (65वे मिनिट), रेगी आढाव (75वे मिनिट) यांनी गोल केले.

अन्य एका सामन्यात नांदेडने 1-1 अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये अमरावतीचा 6-5 असा पराभव केला. नांदेडसाठी खलील खानने 24, तर समीर शेखने अमरावतीसाठी 15 व्या मिनिटाला गोल केला. टायब्रेकरमध्ये नांदेडच्या मोहंमद रुफे, मोहंमद फैझल, अबीद खान, प्रदीप सुर्यवंशी, शुभम परमार, खलील खान यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. अमरावतीकडून सुमार गावंडे सिद्धांत मोहोड, सईद सुफियान, रोहित मेश्राम यांनी जाळीचा अचूक वेध घेतला. समीर शेखला गोल करण्यात अपयश आले. औरंगाबादनेही 1-1 अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये गोंदियाचा 4-2 असा पराभव केला.

निकाल –  Pune

मैदान 1: नाशिक : 6 (ओम फडतरे 2 रे; प्रदिप कनोजिया 36 वे; अनुज लोखंडे 45 वे शुभम दायमा 58 वे; अरुप कुमार 63 वे; रेगी आढाव 75 वे मिनिट) वि.वि. गडचिरोली : 0
नांदेड : 1 (6) (खलील खान 24 वे मोहम्मद रुफे, मोहम्मद फैसल, आबीद खान, प्रदिप सुर्यवंशी, शुभम परमार, खलील खान) वि.वि. अमरावती : 1 (5) (समीर शेख 15वे, सुमित गावंडे, प्रणय चार्ली, सिद्धांत मोहोद, सय्यद सुफियान, रोहित मेश्राम);
परभणी : 3 (अरबाज 1 ले, सिदिक 13 वे; हुजैफा 66 वे मिनिट) वि.वि. सिंधुदुर्ग : 1 (राज धुमाळे 62 वे मिनिट);
लातूर : 5 (शिवचंदर बामणकर 8 वे; मधुर तिडोळे 18 वे, 72 वे; मुझफ्फर शेख 40+3 रे; अनिकेत भडके 66 वे मिनिट) वि.वि. नंदुरबार : 1 (चेतन माळी 40 वे मिनिट)

ग्राउंड-2 : औरंगाबाद : 1(4) (याफई इम्रान बिम 78 वे मिनिट; सय्यद फजलुल हक, सय्यद रेहानमुद्दीन, सोहेल शेख, फैजुल) वि.वि.गोंदिया : 1 (2) (भुवनेश शेंद्रे 48वे; वासू कनोजिया, गौरव गंगभोज);

पालघर : 1 (प्रग्नेश शेट्टी 80+1वे मिनिट) वि.वि. रायगड : 0;
वाशिम : 2 (धीरज महल्ले 5वे; गौरव जोंधळ 43वे मिनिट) वि.वि. उस्मानाबाद : 0
ठाणे: 2 (स्वयं गोल 40+1वे मिनिट, अभिजित शिंदे 58वे मिनिट) वि.वि. नगर: 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.