Pimpri : पिंपरी येथे नव्याने सहा न्यायालये सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे सध्या पाच न्यायालये असून त्याचे नेहरूनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. तिथे आणखी सहा न्यायालये सुरु करण्याची मागणी (Pimpri) पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनकडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

बार असोसिएशनकडून फडणवीस यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, सचिव अॅड. गणेश शिंदे, सहसचिव अॅड. मंगेश नढे, सदस्य नितीन पवार, अॅड. पवन गायकवाड, अॅड. अक्षय केदार, ज्येष्ठ विधिज्ञ माजी अध्यक्ष अॅड. सतिश गोरडे आदी उपस्थित होते.

Khadkwasla : खडकवासला धरणात बुडणाऱ्या 5 मुलींचे 53 वर्षीय संजय माताळेनी वाचविले प्राण 

पिंपरी (Pimpri) मोरवाडी न्यायालयाचे नेहरूनगर येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे. त्याचे उदघाटन होऊन लवकरच न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. पिंपरी न्यायालयाच्या कामाचा भार प्रचंड वाढला आहे. जुन्या इमारतीमध्ये सुरु असलेली न्यायालये कामाचा निपटारा करण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे नेहरूनगर येथील इमारतीमध्ये न्यायालय सुरु झाल्यानंतर एक जिल्हा न्यायालय, दोन जिल्हा व सत्र न्यायालय, तीन वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायालय व पाच नव्याने जेएमएफसी मिळावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

मोशी येथील न्यायालयाच्या कामाचे भूमिपूजन

मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालयाची स्वतंत्र आणि प्रशस्त इमारत होणार आहे. त्यासाठी 15 एकर जागा शासनाने दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशनात न्यायालयाच्या बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 105 कोटी 77 लाख रुपये निधी शासनाने मंजूर केला आहे. न्यायालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन प्रतीक्षेत आहे. त्याची तारीख निश्चित करून कामास लवकरात लवकर प्रारंभ करावा, अशा मागणीचे पत्र देखील पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनकडून उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.