Dighi crime News : घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार; इच्छेविरूद्ध केला गर्भपात

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दत्तनगर, दिघी येथे घडली.

सूरज जोतीराम काशिद (वय 32, रा. मु. पो. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने बुधवारी (दि. 21) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2017 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत दिघी येथे घडली. फिर्यादी महिलेचे 2004 मध्ये पहिले लग्न झाले असून 2013 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 2016 मध्ये त्यांची ओळख हिंगणे, सिंहगड रोड, पुणे येथे आरोपीशी झाली.

आरोपीने फिर्यादी महिलेस लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शाररिक संबंध ठेवले. त्यातून 2017 मध्ये त्या गरोदर राहिल्या असता आरोपीने त्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध कोल्हापूर येथे नेऊन गर्भपात केला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III