River Pollution : पवना आणि इंद्रायणी नद्या प्रदूषण मुक्तीसंदर्भात सामाजिक संस्था, नागरिक आणि प्रशासनामध्ये चर्चा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराच्या जीवनदायिनी (River Pollution) असणाऱ्या पवना आणि इंद्रायणी या दोन नद्या प्रदूषण मुक्त होऊन स्वच्छ सुंदर हरित होत प्रवाही होण्यासाठी सामाजिक संस्था नागरिक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने शहरात जागृती आणि प्रत्यक्ष काम कसे करता येईल या विषयी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह यांची भेट घेण्यात आली.

या भेटीत नदीची सद्य परिस्तिथी प्रदूषणाची कारणे आणि उपाययोजना ह्यावर चर्चा करण्यात आली.

नदी संवर्धन, नदी स्वच्छ्ता अभियान जनजागृती मोहीम, जल दिंडी, नदीयात्रा, जलपर्णी, नदीत मिसळणारे सांडपाणी, नदी किनारी मार्शल मार्फत कचरा टाकण्यास अटकाव करणे, नदीत मिश्रित होणारा घनकचरा प्लास्टिक या सर्व विषयावर सखोल (River Pollution) चर्चा करण्यात आली. आयुक्त साहेब या सर्व विषयांवर खूपच सकारात्मक व सपोर्टीव्ह दिसून आले.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 8 – मधुबाला एक दैवी देणं

यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, जलबिरादरीकडून नरेंद्र चुग, विनोद बोधनकर, सुमंत पांडे, अविरत श्रमदानकडून सचिन भैय्या लांडगे, डॉ. निलेश लोंढे आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी तर्फे गणेश बोरा हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.