Pune News : 150 गरजू कुटुंबीयांस कोरडा शिधा किटचे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पुणे शहर वतीने आज प्रभाग क्र 32 वारजे माळवाडीमधील बारा बलुतेदार समाजापैकी चर्मकार, नाभिक, सुतार, पोतराज, गारूडी, यांच्यासह तृतीयपंथीय, वारकरी संप्रदाय, ड्रायव्हर, अंध -अपंग, मोलमजुरी करणारे भगिनी आदि 150 गरजू कुटूंबियास किमान 15 दिवस पुरेल इतका कोरडा शिधा किटचे वाटप खडकवासल्याचे आमदार भिमराव तापकीर यांचे शुभहस्ते करण्यात आले. 

या किटमध्ये 5किलो गहू आटा, 3 किलो तांदुळ, 1 किलो तुरडाळ, 1 किलो साखर, 1 किलो बेसन, 250 ग्रॅम चहापावडर , जिरे , मोहरी , मिरची पावडर प्रत्येकी 100 ग्रॅम, बिस्कीट पुडे 2, 1 किलो मीठ, 2 कपड्याचे साबण, 2 अंगाचे साबण या साहित्याचा सामावेश होता.

या कार्यक्रमास आमदार भिमरावआण्णा तापकीर यांचे समवेत  आनंद रिठे अध्यक्ष शहर सुधारणा समिती पुणे मनपा , खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे , किर्तनकार धर्मराज महाराज हांडे , किरण बारटक्के सचिव पुणे शहर , रिक्षा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले , एनजीओ आघाडीचे अध्यक्ष डॅा. अजय दुधाने ,ह.भ.प सतीशमामा बोडके , अजित देशपांडे सरचिटणीस सहकार आघाडी , यांचेसह रेश्मा पाटणकर , ऋषिकेश रजावात , अमजद अन्सारी , व्यंकटेश दांगट , किरण साबळे , रेणुका मोरे , वर्षा पवार , यांचेसह लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.