Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात रोज 47 ते 48 माणसांना चावतात कुत्रे

एमपीसी न्यूज – कुत्रा पाळणे सध्या एक आवड झाली आहे. मात्र हीच आवड कधी धोकादायक होईल त्याचा नियम नाही. कारण ते कधी माणसांचा चावा घेतील याचा नेम नाही. सध्या पिंपरी चिंनवडमध्ये रोज ४७ ते ४८ माणसांना हीच कुत्री चावत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हेच प्रमाण यंदा ९ ते १० माणसांना चावण्याचे जास्त आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

 

रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांच्या संख्येवरुन ही आकडेवारी काढल्याचे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.ही संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे कारण काही रुग्ण हॆ कुत्रा चावल्यानंतर खाजगी रुग्णालय किंवा क्लिनिक मध्ये उपचार घेतात.
2019- 20 मध्ये 12 हजार 751 माणसांचा कुत्र्यांनी चावा घेतला होता. यावरून असे दिसते की रोज 34 ते 35 माणसांचा कुत्र्यांनी चावा घेतला होता.

 

2020- 21 मध्ये 13 हजार 832 माणसांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. यावरून असे दिसते की रोज 37 ते 38 माणसांचा चावा घेतला होता.
2021-22 मध्ये 13 हजार 892 माणसांचा कुत्र्यांनी चावा घेतला होता. म्हणजे 38 माणसांचा कुत्र्यांनी चावा घेतला होता.
2022 मधील जानेवारीत 1 हजार 343 माणसांचा कुत्र्यांनी चावले होते. फेब्रुवारीत 1 हजार 235 माणसांना कुत्र्यांनी चावले, मार्चमध्ये 1हजार 620 माणसांना कुत्र्यांनी चावले, एप्रिल महिन्यात 1 हजार 508 माणसांना कुत्र्यांनी चावले होते.

 

मे महिन्यात 1 हजार 509 माणसांना कुत्र्यांनी चावले व जूनमध्ये हीच संख्या 1 हजार 320 इतकी होती. एकूण 8 हजार 535 माणसांना 2022 मध्ये जानेवारी ते जुन दरम्यान कुत्र्यांनी चावले आहे. त्यामुळे मनपा रुग्णालयात व दवाखान्यात या माणसांची गर्दी पहायला मिळते. त्यावर सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफने म्हणाले की, कुत्रा चावल्यानंतर त्यासाठी उपचार घेणाऱ्यांची विशेष गर्दी मनपा रुग्णालयात व दवाखान्यात नसते. तर सर्वांवर तेथे उपचार केले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.