Crime News : विवाहितेचा जातीवरून छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तू आमच्या जातीची नाहीस म्हणत विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पती सासरच्या मंडळींवर अॅट्रॉसिटी व कौटुंबिक हिंसाचाराचा दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला.

 

 

पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती नितीन भारत गांधले (रा.चऱ्होली),सासू, सासरे भारत रघूनाथ गांधले, दिर गोकुळ भारत गांधले (रा. कळंब) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडिता व आरोपी नितीन यांनी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहनंतर नितीन व त्याच्या घरच्यांनी पिडितेला त्रास देण्यास सुरुवात केली, तू महार आहेस आमच्या जातीची नाही, तूझ्यामुळे सगेसोयरे सतत आम्हाला बोलतात म्हणत तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. तसेच घरात बोलणे बंद करत तिला कामात मदत करणे बंद केले. चारित्र्याचा संशय घेत नितीने पिडितेला शिवगाळ व मारहाण देखील केली. यावरून पोलिसांनी आरोपींवर कौटुंबिक हिंसाचार व   अॅट्रॉसिटी  गुन्हा दाखल केला असून दिघी पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.