Vadgaon Maval : राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी जिमची चमकदार कामगिरी

एमपीसीन्यूज –  कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टिंग आसोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी जिमच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्य पदके खेळाडूंनी मिळवली आहेत.

 

ही स्पर्धा 23 व 24 जुलै रोजी दादर येथे पार पडली. या स्पर्धेत इंद्रायणी जिमची खेळाडू साक्षी रोहीदास म्हाळस्कर सबजुनियर 57 किलोगट सुवर्णपदक, स्नेहल संपत म्हाळस्कर 63 किलोगट कास्यपदक, शरन्या केंगार 76 किलोगट सबजुनियर रौप्यपदक व  मुकुंद भामरे 105 किलो सिनियर रौप्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेतून साक्षी म्हाळस्करचे 10 ते 14 केरळ येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

या सर्व खेळाडु शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितिन वसंतराव म्हाळस्कर यांचे मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.