Crime News : एटीएममध्ये भरावयाच्या पैशांतून साडेतीन लाखांचा अपहार;एटीएम एक्झीकेटीव विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एटीएममध्ये भरणा करावयाची रक्कम भरणा न करता परस्पर काढून घेत साडेतीन लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. हा प्रकार 9 जून ते 20 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत भोसरी येथील एसबीआय एटीएम मशीनमध्ये घडला.

 

यावरून संतोष भगवान उदावंत (वय 43 रा.हिंगणे) यांनी भोसरी पोलिसांत तक्रार दिली असून  एटीएम एक्झीकेटीव अशोक गजानन पोतदार (वय अंदाजे 39 रा. दिघी), भगवान अशोक थोरात (वय 22 रा.भोसरी) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेक्युअर व्हॅल्यू लिमीटेड कंपनीचे मँनेजर असून ते ऑडिटचे काम करतात. 20 जुलै रोजी भोसरीतील इंद्रायणी नगरमधील एसबीआयच्या एटीएम मशीनचे ऑडीट करीत असताना त्यांना हा गैरप्रकार निदर्शनास आला. उदावंत यांच्या कंपनीत काम करणारे एटीएम एक्झीकेटीव्ह अशोक व भगवान यांनी 9 जून ते 20 जुलै या कालावधीत मशीनमध्ये भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम 81 लाख रुपये पैकी साडेतीन लाख रुपये हे मशीन न भरता परस्पर काढून घेत कंपनीची फसवणूक केली. यावरून दोघांविराधात फसवणूका गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.