Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज –  दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत एका वृद्ध नागरिकाच्या अंगावरील सव्वा लाखांचे दागिने लंपास केले आहेत. हा प्रकार चाकण ते तळेगाव दाभाडे मार्गावरील सुदुंबरे गावाजवळ मंगळवारी (दि.26) दुपारी दोनच्या सुमारास घडला.

 

जयाराम जेपाराम देवासी (वय.60 रा.खालुंब्रे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोन अज्ञात इसमां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी यांचे खालुंब्रे येथे हार्डवेअरचे दुकान आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून मुलाला जेवणाचा डब्बा घेऊन जात होते.यावेळी त्यांच्या पाठीमागून दोन इसम दुचाकीवरून आले व त्यांनी देवासी यांना गाडी बाजूला घ्यायला लावली. यावेळी त्यांनी देवासी यांना  पोलीस असल्याचे सांगीतले. यावेळी चेकींग करायचे आहे सांगत त्यांनी देवासी यांच्याजवळील  1 लाख 35 हजार रुपयांची सोन्याची चेन व अगंठी काढून ती रुमालात बांधून द्यायला लावली व ते तेथून निघून गेले.  यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.