Pimpri : सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारीसाठी विलंब नको

एमपीसी न्यूज – सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत शक्य तेवढ्या लवकर तक्रार करणे आवश्यक आहे. आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत लवकर तक्रार केल्यास पोलिसांना संबंधित बँक खात्यावरील रक्कम फ्रीज करता येते. यामुळे पिडीत व्यक्तींना लवकर न्याय मिळण्यास मदत होते. क्षणाचा विलंब मोठ्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरतो.

“Alandi : इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कैन्सर इन्स्टिट्यूट”तर्फे आळंदी शहरात जागृती मोर्चा, पथनाट्य

सायबर गुन्हेगार विविध पद्धतींनी नागरिकांना गंडा घालतात. सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची एखादी पद्धत नागरिकांना माहिती होताच हे गुन्हेगार लगेच नवीन क्लुप्त्या शोधून काढतात. व्हिडीओ लाईक करून, ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे घेत फसवणूक करण्याची मोडस सध्या सायबर गुन्हेगारांकडून वापरली जात आहे. त्यासोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असेही आमिष दाखवून पैसे घेत फसवणुकीचे प्रकार घडत आहेत.

डोळेझाकपणे विश्वास ठेऊन अनेकांनी लाखो रुपये सायबर गुन्हेगारांच्या हवाली केले आहेत. आपले पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात येताच नागरिक पोलिसांकडे धाव घेतात. मात्र तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे आपल्यासोबत ऑनलाईन माध्यमातून कोणतीही गुन्हेगारी कृती झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी (Pimpri) -चिंचवड पोलिसांनी केले आहे.

https://twitter.com/PCcityPolice/status/1663794961735663617?s=20

www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सायबर क्राईम बाबत तक्रार करता येऊ शकते. घरबसल्या तत्काळ तक्रार करण्याचे हे चांगले साधन आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सायबर सेल पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत सुरु आहे. तिथे जाऊन देखील तक्रार करता येऊ शकते. [email protected] हा पिंपरी-चिंचवड सायबर सेलचा मेल आयडी आहे. इथे आपली सविस्तर तक्रार, पुराव्यासहित करता येईल.

सायबर पोलिसांना 020-27350939 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करता येईल. तसेच पिंपरी (Pimpri)-चिंचवड शहर पोलीस हद्दीतील आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देखील तक्रार करता येऊ शकते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.