Wagholi : वाघोली येथे पहाटे ट्रेडिंग कंपनीला आग

एमपीसी न्यूज – वाघोली  (Wagholi) येथील पुणे -नगर रोडवरील साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला आज (बुधवारी) पहाटे भीषण आग लागली. यामध्ये गोडाऊन जळून खाक झाले आहे.

कंपनीमध्य़े अमूल कंपनी चे बटर, चीज, मिल्क, आईस्क्रीम, ताक, लस्सी, इतर शीतपेय, होती. घटनास्थळी पीएमआरडीए वाघोली  (Wagholi) अग्निशमन केंद्र येथील दोन अग्निशमन वाहनांच्या तात्काळ मदतीने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली.

तात्काळ मदत मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या मोठी हानी टळली तसेच बाहेर असलेल्या दोन पिकअप वाहनांना सुरक्षित करण्यात आले. या आगीत गोडाऊन मधे असलेले एक महिंद्रा पिकअप डी फ्रिजर असलेले वाहन जाळले, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

हि कारवाई पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन जवान अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक अल्ताब पटेल, ज्ञानेश्वर राठोड ,नितीन माने फायरमन- सुरज इंगवले, प्रशांत चव्हाण, संदीप तांबे, प्रकाश मदने, सचिन गवळी, विकास पालवे, महेश पाटील, रिजवान फरास यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.