Pimpri: शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पांरपारिक वेशभुषेत भव्य मिरवणूक काढण्यात आल्या. मिरवणुकीत लहान मुला-मुलींचा मोठा सहभाग होता. मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते.

पिंपरी येथील जामा मस्जीद जमाते लतिफिया येथे दुपारी दीड वाजता जोहरची नमाज  पठण करण्यात आले. त्यानंतर मुस्लीम धर्मगुरु सय्यद मेहबूबमिया कादरी, शहेजादा-ए-गौस-ए-आझम (अहमदनगर) पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी नियाज अहमद सिद्दीकी, उपाध्यक्ष हाजी युसूफ कुरेशी, सचिव हाजी अकबर मुल्ला, सहसचिव हाजी गुलामरसूल सय्यद, खजिनदार हाजी इद्रीस मेमन(खालू) सहखजिनदार मुश्ताक अहमद शेख, माजी अध्यक्ष हाजी भाईजान काझी, सल्लागार हबीबभाई शेख, झिशान सय्यद, अझहर खान, रमजान अत्तार विविध मशीदीचे मौलाना मुस्लीम बांधवाच्या उपस्थितीत शांताता रॅलीला प्रारंभ झाला.  त्याची सांगता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झाली.

शहरातील विविध मशीदी, मदरसे तेथील धर्मगुरु, मुस्लीम बांधव, पताका, झेंडे, हातात घेऊन एकात्मतेचा संदेश देत मिरवणुका विविध मार्गे पिंपरीत आल्या.  त्यात दुचाकी, चारचाकी, वाहनासमवेत, मक्का मदिना, फुलांचा  आदी प्रतिकृतीचा विलोभणीय समावेश होता.  सांगवी पोलीस ठाण्यात ईद-ए-मिलाद आणि दिपावलीनिमित्त जातीय सलोखा कार्यक्रम घेण्यात आला.

देहूरोड भागातून सुरुवात होऊन पुढे निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, येथून मिरवणूका निघाल्या. वाकड, काळाखडक, थेरगांव, काळेवाडी, पिंपरी, कॅम्प मार्गे मिरवणूका काढण्यात आल्या.  दापोडी, फुगेवाडी, पिंपळेगुरव, कासारवाडी, येथून तर दिघी, चोवीसावाडी, भोसरी, लांडेवाडी, बालाजीनगर, नेहरुनगर, अजमेरा मार्गे, मिरवणूका काढण्यात आल्या.  जागोजागी पिण्याचे पाणी, शरबत, फळ,  मिठाईचे वाटप करण्यात आले.  पिंपरी येथे हजरत हाश्मी मियॉ आशरफ  कछोछा शरिफ  यांचे प्रवचन झाले.  या कार्यक्रमाची प्रस्तावना जुलूस कमीटीचे उपाध्यक्ष हाजी युसूफ कुरेशी यांनी केले. सूत्रसंचालन सचिव हाजी अकबर मुल्ला यांनी केले. तर, अध्यक्ष हाजी नियाज अहमद सिद्दीकी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.